एल्फिस्टन पूल पाडण्याची वेळ चुकीची,काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका

0

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधा क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी आपण करीत असल्याचे दाखविण्यासाठी नियोजनशून्य पद्धतीने युती सरकार विकासाचे आराखडे तयार करीत आहे. सध्या नवरात्र चालू असताना व अवघ्या काही दिवसावर दिवाळी आली असताना एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णय हा अत्यन्त चुकीच्या पद्धतीने घेतला गेला असून याच्या दुष्परिणामांमुळे सध्या परेल, शिवाजी पार्क, माहीमपासून ते थेट दादर – माटूंगा पर्यंत लोकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे एकीकडे पेट्रोलचा अतिरिक्त अनावश्यक वापर, प्रदूषण तसेच जनतेच्या अमूल्य वेळेचे नुकसान होत असून दुसरीकडे आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या महाराष्ट्राला अश्या चुकीच्या निर्णयांमुळे युती सरकार आणखी आर्थिक तोट्याच्या दरीत टाकत आहे अशी खरमरीत टीका शहर रचनाकार असलेले काँग्रेसचे जेष्ठ प्रवक्ते आर्की. अनंत गाडगीळ यांनी केली आहे. आज जर रस्त्यावरील गर्दीची सदर परिसरात हि अवस्था असेल तर ऐन दिवाळीत इथे चेंगराचेंगरीचा धोका उद्भवण्याची शक्यता गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech