कल्याणच्या चार्म्स हेरिटेज C2 को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मोठा घोटाळा उघडकीस

0

कल्याणमध्ये कॉमन स्टिल्ट पार्किंग विक्री प्रकरणासंबंधी १३ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे : कल्याणमध्ये C2 को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मोठा घोटाळा उघडकीस आला असून सोसायटीच्या कॉमन स्टिल्ट पार्किंग स्पेसची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सोसायटीतील रहिवाश्यांचा देखील समावेश आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल असला तरी पुढील सुनावणीला याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या १३ जणांमध्ये सोसायटीच्या व्यवस्थापन समितीतील ११ सदस्य, तसेच विक्रेता आणि खरेदीदार यांचा समावेश आहे. आरोपानुसार, सर्व आरोपींनी संगनमत करून सोसायटीच्या सामाईक जागेचा गैरवापर करत स्वतःचा फायदा करून घेतला आणि सदस्यांचे नुकसान केले. यानंतर म्हणजे १८ सप्टेंबर २०२५ रोजी कल्याण न्यायालयाने दखल घेत १३ आरोपींना समन्स बजावले. त्यापैकी १२ आरोपी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने सुनावणी करून त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडले.

या प्रकरणातून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अधोरेखित झाला असून सोसायटीतील कॉमन एरिया विक्री किंवा खरेदी करता येत नाही. कारण हा प्रत्येक सदस्याचा अविभाज्य हक्क असतो. अशा प्रकारे सामाईक हक्कांवर गदा आणणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा मानला जात असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या चार्म्स हेरिटेज C2 को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत घोटाळा उजेडात आला आहे. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीतील एक सदस्य मनीष कुमार यांनी खडकपाडा पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांना नेमका गुन्हा कोणता? हे समजत नसल्याने कारवाई लांबली होती. अखेर जून २०२४ मध्ये LEXWISSE LEGAL या विधी फर्मच्या मदतीने खाजगी फौजदारी तक्रार दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech