युपीएससी परीक्षेत सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

0

सोलापूर : युपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. एकूण १२ जागांसाठी देशभरातील ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे. मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत.

युपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा लेखी निकाल ९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली. अखेर मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते.

मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनाॅमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी १२ वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मयुरेश यांचे अजोबा अंगद वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेत मयुरेश यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे त्यांच्या अभिनंदनात सांगितले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech