टाटा पॉवरने ‘१०० शहरे, १ उद्दिष्ट’ अंतर्गत ईझेड होमचा विस्तार केला

0

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये स्मार्ट आणि सस्टेनेबल जीवनाचा आदर्श आखून दिला 

कल्याण, मुंबई : भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी, टाटा पॉवरने आपली नाविन्यपूर्ण ईझेड होम ऑटोमेशन सोल्युशन्स ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये उपलब्ध करवून दिली आहेत. ‘१०० शहरे, १ उद्दिष्ट’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचा हा एक भाग आहे. सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण करण्यात आणि नूतनीकरणीय ऊर्जा स्वीकारण्यात वेगाने पुढे जात असलेली देशाची आर्थिक राजधानी टाटा पॉवरच्या ईझेड होम एक्सपीरियन्स सेंटरमार्फत आपल्या रहिवाशांना स्मार्ट, सस्टेनेबल आणि सहजसोपी कनेक्टेड जीवनशैली मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. हे लॉन्च म्हणजे भारतभरातील घरे अधिक स्मार्ट, अधिक हरित आणि ऊर्जा बचतीसाठी अधिक सक्षम बनवण्याच्या टाटा पॉवरच्या मिशनमध्ये उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे.

टाटा पॉवरने कल्याणच्या ईझेड होम एक्सपीरियन्स सेंटरचे उदघाटन केले आहे. जास्तीत जास्त कुटुंबांनी इथे येऊन या एक्सपीरियन्स-सेंट्रिक टूरची माहिती करून घ्यावी, इंटिग्रेटेड स्मार्ट होम सोल्युशन्स पाहावीत, उत्पादने आणि सेवांची संपूर्ण श्रेणी प्रदर्शित केलेल्या इंटरॅक्टिव्ह लाईव्ह वॉलसोबत इंटरॅक्ट करावे, असे आवाहन या सेंटरने केले आहे. एका वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या या इमर्सिव्ह सेटअपने कल्याण हे एक दूरदृष्टी असलेले शहर म्हणून विकसित होत असल्याचे आणि शाश्वतता व नावीन्य यांच्यासह आधुनिक शहरी विकासाची सांगड घालणारे शहर बनत असल्याचे दर्शवले आहे.

ईझेड होम ऑटोमेशनमुळे प्रत्येक घराला लायटिंग, वातावरण, अप्लायन्सेस, सुरक्षा आणि ऊर्जा उपयोग यांच्यावर इंट्यूटिव्ह, ऍपवर आधारित नियंत्रण ठेवता येते. प्रीमियम टच स्विचेस असल्याने विविध अप्लायन्सेसवर दुरून नियंत्रण ठेवता येते, कन्व्हर्टर स्विचेस आधीच्या स्विचेसना स्मार्ट बनवतात व त्यासाठी पुन्हा वेगळे वायरिंग देखील करावे लागत नाही. सेन्सरवर आधारित लायटिंगमुळे जिने, लॉबी आणि पार्किंग अशा जागी ऊर्जेचा वापर ८०% पर्यंत ऑप्टिमाइज होतो.

ईझेड होम ऍपमार्फत, रहिवासी मल्टी-लेवल कन्झम्पशन ऍनालिटिक्स, प्रतिबंधात्मक देखरेख सूचना आणि इंटेलिजंट वीज व्यवस्थापन यांचे लाभ मिळवू शकतील आणि वीज जात-येत असताना आवश्यक लोडला प्राधान्य देईल. भविष्यासाठी सज्ज आणि आयओटी-सक्षम असलेली ही सिस्टीम अलेक्सा आणि गूगल होम यासारखी व्हॉइस असिस्टंट्ससोबत त्याचप्रमाणे स्मार्ट सिक्युरिटी डिव्हायसेससोबत इंटिग्रेट होते. त्यामुळे डेटा भारतात सुरक्षित राहतो.

स्मार्ट सॉकेट्स, टच पॅनल स्विचेस, मोशन सेन्सर्स आणि रेट्रोफिटेबल कन्व्हर्टर्स यांचा समावेश असलेला उत्पादन पोर्टफोलिओ शहरी कुटुंबे तसेच निम-शहरी समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे अधिक स्मार्ट आणि अधिक हरित जीवनशैली स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत.

या लॉन्चमुळे मुंबई देखील टाटा पॉवरच्या ईझेड होम ‘१०० शहरे १ उद्दिष्ट’ या उपक्रमाचा एक भाग बनली आहे. कनेक्टेड, सस्टेनेबल आणि ऊर्जा-सक्षम घरांच्या दिशेने घेतलेली ही मोठी भरारी आहे, जी भारतभरातील कुटुंबांना अधिक स्मार्ट, अधिक हरित भविष्य मिळवून देईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech