मुंबई : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आता १३ ऑक्टोबरऐवजी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.