महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी कमान धोकादायक; पाच फूट रॉड कोसळला, सुदैवाने अनर्थ टळला!

0

ठाणे पूर्व मीठ बंदर रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिसरात ठाणे महापालिकेने उभारलेली लोखंडी कमान पूर्णपणे गंजल्याने धोकादायक ठरली आहे. मंगळवारी रात्री कमानीचा पाच फूट लोखंडी रॉड खाली पडला; सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत कमानीची तात्काळ तपासणी व हटविण्याची मागणी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech