अमृतांजन हेल्थकेअरचा ग्राहकांचा आवडता पिवळा बाम पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये

0

नागपूर : गेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजनचा पिवळा बाम म्हणज अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतीयांच्या घरी रात्री पलंगावर हा बाम हमखास आढळतो. प्रवासातही हा बाम वापरणारी अनेक मंडळी दिसून येतात. घरातील कुणालाही डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास झाल्यास एका हातातून दुस-या हातात प्रेमाने दिलेला हा बाम आश्वासक स्पर्शाने आधार देतो. शांत आणि सुखद सुगंधाने वेदनेपासून आराम मिळतो. कित्येक वर्षांच्या आधारामुळे आणि या बामच्या अस्तित्वामुळे अनेकांच्या सुंदर आठवणी तयार झाल्या आहेत. अमृतांजन हेल्थकेअरचा पिवळा बाम अनेकांच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला आहे. हा विश्वास गेल्या १३० वर्षांतील कधीही न डगमगलेल्या खात्रीचे प्रतीक आहे.

जुन्या आठवणींना उजाळा देत अमृतांजन हेल्थकेअरने आपल्या लोकप्रिय आणि आयकॉनिक पिवळ्या बामला पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले आहे. क्लासिक काचेच्या बाटलीतील पिवळा बाम लोकांना सर्वात जास्त आवडतो. पिवळ्या बामचि पुनरावृत्ती अविस्मरणीय असावी याकरिता प्रत्येक बाटलीत २५ टक्के अतिरिक्त बाम देण्यात आला आहे. अमृतांजनच्या विश्वासावर आणि आरामदायी उपचारांवर पिढ्यानपिढ्या जपलेले ग्राहक उत्तरोत्तर वाढत राहतील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

बाजारात पिवळा बाम परत येत असल्याची माहिती सर्व ग्राहकांना पोहोचवण्यासाठी अमृतांजनने दोन नव्या जाहिरातींची निर्मिती केली आहे. शारीरीक वेदना कार्यालयीन ठिकाण, प्रवास ते अगदी साध्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कामकाजांत व्यत्यय आणतात. दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणा-या वेदनांवर अमृतांजनचा पिवळा बाम लोकांना सहज मुक्त करतो. वेदनेच्या भागावर बाम लावताचक्षणी लोकांना नैसर्गिकरित्या झटपट दिलासा मिळतो. बामचा वापर केल्यानंतर लोकांना त्या क्षणांचा पूरेपूर आनंद घेता येतो. अमृताजनंच्या या बामची ही किमया दोन्ही जाहिरातींमध्ये प्रभावीपणे मांडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमृतांजनचा पिवळा बाम औषधाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील विश्वासार्ह सोबती म्हणून वावरला आहे. या बामच्या वापराने अनेकांना पिढ्यानपिढ्या आराम मिळाला आहे. आता हा बाम जुन्या आकर्षक काचेच्या बाटलीत शक्तीशाली जाहिरातींसह पुन्हा सर्वांसमोर येत आहे. नव्याने सादर झालेला हा बाम वेदनाशमनाचे आश्वासन पाळतो. अमृतांजन कंपनी आपल्या ग्राहकांना शाश्वत आराम देण्याची आधुनिक काळाची जबाबदारी पार पाडत मूल्यांच्या अपेक्षाही पूर्ण करते.

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. संभू म्हणाले, ‘‘गेल्या शतकांहून अधिक काळ भारतातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या रोजच्या वेदना निवारण क्षणांसाठी अमृतांजन बामवर विश्वास ठेवला आहे. १८९३ मध्ये पहिल्यांदा अमृतांजन वेदनाशमन बामचे बाजारात अनावरण झाले होते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात अनेक घरांत पिढ्यानपिढ्या अमृतांजनच्या पिवळ्या बामचे अस्तित्व टिकून आहे. आता बाजारात पुन्हा उपलब्ध होताना ग्राहकांना अपेक्षित गोष्टींची पूर्तता केली आहे. ग्राहकांना अजून चांगला आराम मिळेल, अगोदरपेक्षा जास्त बाम वापरता येईल तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग राहील याकडे आम्ही लक्ष दिले आहे. काचेच्या बाटलीत मिळणारा हा पिवळा बाम केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नसून, आमची १३० वर्षांची अविरहित वचनबद्धताही दर्शवते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी दर्शवलेली काळजी आता अजूनच सक्षम झाली आहे.’’

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्री. मणी. भगवतीश्वरन म्हणाले, हा पिवळा बाम ग्राहकांसाठी औषधोपचारांसह ओळख आणि विश्वासाही भावना आहे. प्रत्येक कुटुंबासाठी या बामसोबत एक आठवण जोडलेली आहे. या पुनप्रेक्षणाने आम्ही नवीन आठणी निर्माण करु इच्छितो. बामसाठी काचेच्या बाटल्यांचे वेष्टन हे जबाबदारीक आणि भावनिक निर्णयात्मक पाऊल आहे. अमृतांजन आपल्या मूळ तत्त्वांशी पुन्हा जोडला गेला आहे. नव्या पिढ्यांसाठीही हा बाम प्रभावी आणि महत्त्वाचा ब्रँण्ड राहील याची खात्री आहे. बाजारात पिवळा बाम पुन्हा उपलब्ध करुन देत अमृतांजनने ग्राहकांच्या वेदनाशमनाची आणि आरामाची परंपरा कायम ठेवली आहे. ही अखंड परंपरा यापुढेही प्रत्येक घरात कायम राहील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech