छत्रपती संभाजीनगर : राज्यात नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.विधानसभेप्रमाणेच सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन शिवसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज वैजापूर येथे केले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आज शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरात विकासकामे मार्गी लागली आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर जनकल्याणासाठी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, युवा वर्गासाठी, शहरी तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव कामे केली. यामुळेच आज शिवसेना अधिक जोमाने सर्वत्र काम करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांसाठी आपण योजना राबविल्या आणि त्यांना आधार दिला. अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदत दिली.
आता वेळ आली आहे जनतेमध्ये जाऊन या सर्व कामांची माहिती द्यायची असेही यावेळी सांगितले. राज्यात नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभेप्रमाणेच सर्वांनी एकजुटीने काम करा. वैजापूरच्या विकासासाठी आपली शिवसेना कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने काम केले तर निश्चितच सगळीकडे महायुती विजयी होईल. यासाठी नगरपरिषदेच्या, पंचायत समिती, महापालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले. यावेळी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदीपान भुमरे, उपनेते अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील, अण्णासाहेब माने – पाटील, कैलास पाटील, साबीर भाई, बाबासाहेब पाटील – जगताप, प्रतिभा ताई जगताप, सुलभा भोपळे, भरत पाटील, राजेंद्र पाटील – साळुंखे, राम हरी जाधव, भगिनाथ भगर, राजीव डोंगरे, शिवसेना डॉक्टर सेलचे प्रमुख धनंजय पडवळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.