नवी दिल्ली : जसा-जसा नोव्हेंबर महिना पुढे जाईल, तसा फुफ्फुसांवरील कार्यक्षमतेचा भार वाढत जाईल,” असे विधान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर बोलताना केले. थरूर यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहिले, “जसा-जसा नोव्हेंबर वाढेल, फुफ्फुसांवरील कार्यक्षमतेचा भार वाढत जाईल.” त्यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा दिल्लीतील सकाळी धुक्याने आणि प्रदूषणाने व्यापलेल्या असतात आणि हवेची गुणवत्ता ‘खराब’ व ‘अतिशय खराब’ या श्रेणींमध्ये झुलत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता दिल्लीचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) २७१ इतका नोंदवला गेला, जो ‘खराब’ श्रेणीत येतो. संध्याकाळपर्यंत हवा आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या अंदाजानुसार, दिल्लीतील हवा उशिरा संध्याकाळपर्यंत ‘अतिशय खराब’ श्रेणीत पोहोचू शकते. या सिस्टीमने पुढील अंदाज दिला आहे की, ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीची हवा ‘अतिशय खराब’ श्रेणीतच राहील. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिल्लीचा एक्यूआय २०२ होता, जो आता सातत्याने वाढत आहे. काही भागांतील स्थिती अधिक गंभीर आहे. दिल्लीतील प्रदूषण वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
माहितीनुसार, PGIMER चे प्राध्यापक डॉ. पुलिन गुप्ता यांनी सांगितले की, ओपीडीमध्ये ब्रॉंनकायटिस, दमा (अस्थमा) अटॅक आणि सायनोसायटिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांनी हेही नमूद केले की, अनेक रुग्णांना नाकातून रक्त येणे, डोळ्यांत जळजळ व पाणी येणे, तसेच दृष्टी धूसर होणे अशा तक्रारी आहेत. प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम त्या लोकांवर होत आहे, ज्यांना आधीपासून अस्थमा, ब्रॉंनकायटिस किंवा क्षयरोग (टीबी) आहे.अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या समस्या असलेले लोक शक्यतो घरातच राहावेत आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.