ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

0

ठाणे : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती निमित्त ठाण्यात आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव – २०२५ चे आयोजन येत्या १५ नोव्हेंबर २०२५ रोजी ठाण्याच्या खेवरा सर्कल, खेवरा फार्म हाऊस, संघटनेच्या मुख्य कार्यालयाच्या समोरील पटांगण, चितळसर – मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे ( पश्चिम ) येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात क्रांतीज्योत मिरवणूक, दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन, आदिवासी स्वागत गीत, मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण, गौरी नाच, तारपा नाच, बोहडा सोंग, पाहुण्याचे स्वागत अशी महोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा असून कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी सदरील महोत्सवास दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थापक तथा अध्यक्ष हंसराज खेवरा आणि संघटनेचे सदस्य सुनिल तुकाराम भांगरे यांनी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech