नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

0

नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ युएएफ एक्सपोचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरम तर्फे आयोजित ‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ या युएएफ एक्सपोचे उदघाटन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजक, स्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टर्स अपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उर्मीजच्या कला मंचा” (UAF) तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी यासंदर्भात UAF एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शन, करिअर समुपदेशन, विद्यापीठ भागीदारी, आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील .आणि अशा UAF एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील.

मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहे, डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. आजच्या युगात डिझाइन हे ‘आर्ट’पेक्षा अधिक ‘सायन्स’ झाले आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल आहे, असे मंत्री श्री पाटील यावेळी सांगितले.

भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकी, वास्तुकला, उत्पादन, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट, तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑन, व्यावहारिक, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आ. पराग अळवणी, उर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कोमल उल्लाल, गुरुचरण सिंग संधू, क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, मोहन वेदपाठक आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech