दिव्यांग स्टॉलवर कारवाई केल्याने अपंग विकास महासंघाचे केडीएमसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन

0

कल्याण : कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरात असलेल्या दिव्यांग स्टॉलवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई केल्याने अपंग विकास महासंघाने केडीएमसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने २००८ साली लक्ष्मण मोरे यांना लालचौकी परिसरात दिव्यांग स्टॉलची परवानगी दिली आहे. असे असतांना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांनी या दिव्यांग स्टॉलवर कारवाई करत तोडले आहे. यामुळे दिव्यांग लक्ष्मण मोरे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याची माहिती अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech