नवी दिल्ली : राजधानीती दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) किंचित कमी झाला आहे. पण तो “खूपच वाईट” श्रेणीत आहे. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टमच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी सरासरी AQI ३५९ नोंदवण्यात आला. शुक्रवारी नोंदवलेल्या सरासरी AQI ३६४ पेक्षा थोडीशी सुधारणा झाली असली तरी, काही भागात सकाळी विषारी धुराचा थर कायम राहिला. काही भागात, AQI ४०० पेक्षाही जास्त झाला आहे, ज्यामुळे त्या भागातील हवा “गंभीर” झाली आहे. सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीची राजधानी आनंद विहारमध्ये आज सकाळी AQI ४२०, अशोक विहार ४०३, आया नगर ३३३, बवाना ४१४, बुरारी ३७४, DTU ३९६, द्वारका ३८९, ITO ३७०, जहांगीरपुरी, ४१४, मुनगंरपुरी ३१६, पंजाबी बाग ३७०, रोहिणी ४१२, आरके पुरम ३७२, वजीरपूर ४२७.