मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण कामातील गैरवर्तन, निष्काळजीपणा भोवला

0

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्याचे निलंबन

कल्याण : मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण कामातील गैरवर्तन, निष्काळजीपणा भोवला असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण काम मनपा मार्फत जिवरक्षा ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट, पुणे यांना ठेका देण्यात आला होता, त्या नुसार भटक्या श्वानांना पकडणे लसीकरण केंद्रात नेत देखभाल करीत त्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करणे व श्वानांना त्यांच्या मुळ जागी परत नेऊन सोडणे आणि रेबिज आजाराने बाधित श्वानांना पकडून विलगिकरणामध्ये ठेवणे इत्यादी कामे समावेश होता.

यासाठी श्वानांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रियेपोटी रू.९८९/- प्रती श्वान या दराने ३ वर्षाकरीता कार्यादेश देण्यात आलेला असुन यांचेमार्फत प्राप्त होणाऱ्या मासिक देयकाचा खर्च “भटकी कुत्री व मांजरी नसबंदी ARE080328” या लेखाशिर्षाकांतर्गत अंतर्गत उपलब्ध तरतूदीतून भागविण्यात येत होता. या कामाची ०२.०३.२०२५ रोजी कामाची मुदत संपून देखील 6माहिन्यांची वाढ देण्यात आली होती. मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण कामासाठी मनपाचा लाखो रू. खर्च होऊन देखील मोकाट कुत्र्यानी चावा घेतलेल्या वाढत्या घटना वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता या कामा संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यांची दखल घेत, संदर्भीत कामा संदर्भात ठेकेदार संस्थेकडून खुलसा मागविण्यात आला असता खुलाश्यामध्ये विचारणा करण्यात आलेल्या बहुतांश मुद्दयांबाबत समर्पक उत्तरे प्राप्त झाली नाही.

याप्रकरणी अनियिमतता झाल्याचे सकृतदर्शनी दिसून आले असल्याने आरोग्य कर्मचारी कमलेश सोनवणे याने या कामाचे दैनंदीन पर्यवेक्षक व नियंत्रण करण्यात जबाबदारीमध्ये अक्षम्य दुर्लक्षपणा केलेला असल्याचा ठपका ठेवत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी 26नोव्हेंबर 2025रोजी निलबंनाचा आदेश काढले असल्याने आता कर्तव्यात कसूर, कामात अनियमिता, कामचुकार गैरवर्तन करणार्या कर्मचारी आधिकारी यांची आता खैर नसल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech