नागपूर : वेगळ्या विदर्भाबाबत आमची भूमिका कायम आहे. यावर आम्ही काम करत असल्याचे भाजपा नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कांग्रेस पार्टी आता काढत आहे, मात्र हा मुद्दा आमचा आहे. भाजपच्या अजेंडाचा मुद्दा आहे. भाजपच्या अजेंडातून हा मुद्दा बाहेर गेलेला नाही, आम्ही त्यावर पहिल्यापासूनच काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूचीच असल्याचे बावनकुळे म्हणाले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. यामुळं राजकारण चांगलच तापलं आहे. यावर बावनकुळे यांनी भूमिका सष्ट केली आहे.