पंतप्रधान मोदी जॉर्डनमध्ये दाखल; पंतप्रधान जाफर हसन यांनी केले स्वागत

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जॉर्डनमध्ये दाखल झाले आहेत. किंग अब्दुल्ला दुसरे बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जॉर्डनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.या दौऱ्याचा उद्देश अरब देशासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. पंतप्रधान मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान येथे उतरले. विमानतळावर आगमन होताच जॉर्डनचे पंतप्रधान जाफर हसन यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले.

या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले,“अम्मान येथे पोहोचलो आहे. विमानतळावर जॉर्डनच्या हाशमी साम्राज्याचे पंतप्रधान जाफर हसन यांनी दिलेल्या उबदार स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ही भेट आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करेल, असा मला विश्वास आहे.” जॉर्डनच्या अम्मान शहरातील एका हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय प्रवासी समुदायाच्या सदस्यांनी मनापासून स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद घेतला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech