काँग्रेसच्या सचिन पोटे यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

0

मनसेच्या देसाई दाम्पत्याने देखील हाती घेतला शिवसेनेचा भगवा, महापालिका निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचे घोडे फरार करायचे आहेत – एकनाथ शिंदे

कल्याण : गत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला असून आता महापालिका निवडणूक जिंकून त्यांचे घोडे देखील फरार करायचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापत असून काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेविका जान्हवी पोटे यांच्यासह मनसेचे कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी देखील शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण पूर्वेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे , जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, शहर प्रमुख निलेश शिंदे, रवी पाटील आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्ष प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान, विमल ठक्कर, प्रवीण साळवे, मनसेचे कल्याण शहर सचिव यतीन जावळे, ठाकरे गटाच्या आशा रसाळ आदींसह काँग्रेस, मनसे, उबाठा मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, सचिन पोटे लढवय्या कार्यकर्ते असून काँग्रेस मध्यें प्रमाणिक काम केलं. कल्याण डोंबिवली एक से बढ कर एक टीम असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची टीम असून या टीम मध्ये सचिन आलाय. महायुतीची ही टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी शिवसेने शिवाय पर्याय नाही. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकसभा , विधानसभा निवडणुक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला असून महापालिका निवडणुक जिंकून त्यांचे घोडे फरार करायचे आहेत. कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा रहाणारा एकनाथ शिंदें असून या भागातील प्रश्न सोडविण्याचे काम करायचे आहे. अनेक विकासकामे सुरू आहेत. कोणी कितीही शिव्या शाप दिल्या, टोमणे मारले तरी तिकडे लक्ष न देता लोकांची कामं करायची आहेत. केडीएमसी क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५ कार्यक्रम जाहीर झाला असून मनपावर आपला झेंडा फडकिवण्यासाठी शिवसेना शिंदे गट,आणि भाजपा यांनी महायुती चे संकेत दिले असले तरी १२२ प्रभागात आपले पक्षीय बळाबळ वुध्दागित करण्यासाठी इतर पक्षातील माजी सिटिंग नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत पँनल पध्दतीत ३१ पँनल मध्ये आपली पक्षीय तकाद वाढविण्याचा कलगीतुरा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात रंगला असल्याचे चित्र दिसत आहे. निमित्त आहे, की शिवसेना शिंदे गटात गुरुवारी काँग्रेसचे सचिन पोटे, जान्हवी पोटे यासह मनसेच्या कस्तुरी देसाई, यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश कार्यक्रमाचा झगमगाट आणि,काँर्पेारेट दर्शन पाहता दया दाल कुछ काला है अशा महायुती बद्दल चर्चा जाणकराकडून होत होत्या. तर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडी यांची कल्याण पूर्वेतील पोटे मैदानावर झालेली गर्दी पाहता, शक्ती प्रर्दशन कोणावर दबाव आणण्यासाठी केले गेले ,यांचे उत्तर हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित दिसून येईल., आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा टाकलेला डाव हा महापौर पदासाठी निश्चित उजवा ठरणार? असा सवाल यानिमित्ताने राजकीय समक्षीकाना उभा ठाकला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech