विकासकार्य आणि लोकसभा कामकाजातील सक्रिय नेतृत्व
भारतीय लोकशाहीत खासदाराची भूमिका केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजचा लोकप्रतिनिधी हा विकासाचा सूत्रधार, धोरणांचा दुवा आणि संसद–जनता यांमधील सेतू असतो. या बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विशेष लक्षवेधी ठरते.
वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले, आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणारे आणि संसदीय शिस्त पाळणारे नेतृत्व म्हणून त्यांनी २०१४ पासून आजतागायत स्वतःची एक स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे लोकाभिमुख विकासकार्य आणि लोकसभा कामकाज हे परिणाम, सातत्य आणि अभ्यास या तीन स्तंभांवर उभे आहे.
वैद्यकीय पार्श्वभूमी : निर्णयक्षमतेची शिस्त
डॉ. श्रीकांत शिंदे हे मूळचे ऑर्थोपेडिक सर्जन. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासीवृत्तीमुळे निर्णय घेताना अचूकता, वेळेचे व्यवस्थापन व भान आणि मानवी संवेदनशीलता हे गुण त्यांच्या सार्वजनिक जीवनात ठळकपणे दिसतात.
अनपेक्षितपणे राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी लोकसेवेचा विस्तार म्हणून कल्याण लोकसभा क्षेत्रातून शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून येऊन लोकप्रतिनिधीत्व स्वीकारले व ते ३ टर्म भरघोस मताधिक्याने निवडून आले आणि हीच लोकहिताची भूमिका त्यांच्या कामकाजात सातत्याने जाणवते.
मतदारसंघातील भराव विकासकार्य व स्थानिक नागरी गरजांची राज्य व राष्ट्रीयस्तरावरून अंमलबजावणी
कल्याण–डोंबिवली हा विकासात्मक नकाशावर वेगाने वाढणारा शहरी परिसर आहे. वाढती लोकसंख्या, नागरी सुविधा, वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या सगळ्या आव्हानांमध्ये डॉ. शिंदे यांनी महत्वाचा असलेला समन्वयात्मक “पायाभूत विकास” (Infrastructure Development) करण्याचे वास्तवदर्शी मॉडेल स्वीकारले.
👉1. पायाभूत सुविधा
• रस्ते, पूल व वाहतूक सुधारणा
• रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा
• नागरी सुविधा उपलब्धतेसाठी केंद्र–राज्य शासन समन्वय
👉2. आरोग्य क्षेत्र
• सरकारी आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न
• कोविड काळात रुग्ण, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांमधील समन्वय
• प्राथमिक आरोग्य सुविधांवर भर, विविध वैद्यकिय शिबिरांचे मतदारसंघात आयोजन
👉3. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी
• प्रधानमंत्री आवास योजना
• आयुष्मान भारत
• उज्ज्वला, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांचा प्रभावी पाठपुरावा केला. त्यांची कार्यपद्धती ही योजनांच्या उद्घाटनापुरती मर्यादित न राहता, लाभार्थीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यावर केंद्रित राहिली आहे. धार्मिक, सांस्कृतिक क्रिडा व शिक्षण क्षेत्रात युवा व सामान्य जनतेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले.
लोकसभा कामकाज : उपस्थिती व प्रभाव
संसदेत अनेक सदस्य असतात; मात्र सक्रिय आणि परिणामकारक खासदार कमी असतात. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा कामकाजातील सहभाग हा कायम अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद राहिला आहे.
प्रश्नोत्तर तास
• नागरी विकास
• आरोग्य व्यवस्था
• पायाभूत सुविधा
• युवक व रोजगार विषय
या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न केवळ औपचारिक नसून, ते ग्राउंड-लेव्हल समस्यांचे प्रतिबिंब असतात हे दिसून आले.
संसद चर्चांतील सहभाग
महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चेत त्यांनी तथ्य, अनुभव आणि व्यवहार्यता यांचा समन्वय साधत भूमिका मांडली त्यामुळे त्यांची ओळख एक जबाबदार संसदरत्न म्हणून झाली.
संसदीय समित्या आणि धोरणात्मक दृष्टिकोन
लोकसभा समित्यांचे कामकाज हे संसदेचे कणा मानले जाते. डॉ. शिंदे यांनी विविध समित्यांमधील सहभागातून धोरणांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले. यामुळे केवळ कायदे तयार होत नाहीत, तर ते प्रत्यक्षात कसे सकारात्मक परिणाम देतात, यावरही चर्चा होते.
राष्ट्रीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका
डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास बाब म्हणजे स्थानिक प्रश्न मांडताना ते राष्ट्रीय संदर्भ जोडतात.
• शहरीकरण
• सार्वजनिक आरोग्य
• युवक धोरण
• पायाभूत गुंतवणूक
या विषयांवर त्यांनी संसदीय व्यासपीठावर संतुलित आणि विकासाभिमुख भूमिका घेतली आहे.
संवाद कौशल्य आणि लोकशाही मूल्ये
एक प्रभावी खासदार हा केवळ संसदेत बोलणारा नसतो, तर जनतेशी संवाद साधणारा असतो. डॉ. शिंदे यांनी:
• कार्यकर्ता–नागरिक संवाद
• आधुनिक माध्यमांचा वापर
• तक्रारींचे वेळेत निराकरण…..
या माध्यमातून लोकशाही सहभाग अधिक मजबूत केला आहे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील ओळख
आज डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नाही. संसदीय कामकाजातील शिस्त, विकासावर केंद्रित दृष्टिकोन आणि आधुनिक नेतृत्वशैली यामुळे ते राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक खासदारांच्या यादीत ते गणले जात आहेत.
परिणामाभिमुख लोकप्रतिनिधीत्वाचा नमुना
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे कार्य हे आजच्या भारतीय लोकशाहीत परिणाम, उत्तरदायित्व आणि अभ्यासाधारित राजकारणाचा नमुना ठरते. मतदारसंघ विकास आणि लोकसभा कामकाज यांचा संतुलित समन्वय साधत त्यांनी लोकप्रतिनिधीची भूमिका नव्याने परिभाषित केली आहे. आजच्या काळात राजकारणावर अविश्वास वाढतो आहे, त्या काळात कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्वच लोकशाहीला बळकटी देते आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे कार्य हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
– दिनेश शिंदे
मिडिया समन्वयक
शिवसेना पक्ष