कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ४ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

0

रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे हे शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध विजयी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन तर प्रभाग क्र. 28 मधून हर्षल राजेश मोरे हे नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता मोरे यांनी वर्तविली आहे.

यावेळी शिवसैनिकांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेसमोर जल्लोष केला. यावेळी आमदार राजेश मोरे, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तसेच प्रभाग क्र. २८ मध्ये हर्षल मोरे हे निवडून आले आहेत. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. तर या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech