नाशिक : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच महापौर होईल आणि महायुतीची सत्ता येईल यात मात्र शंका नाही असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे आज पासुन नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीच्या वार्तांकनासाठी मिडीया सेंटर सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन उपाध्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवक्ते अजीत चव्हाण, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाना शिलेदार, सुनील देसाई, गोविंद बोरसे पियुष अमृतकर उपस्थित होते. यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की , राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या चिंधड्या उडालेल्या आहेत त्यामुळे होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात २९ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल आणि महायुतीची सत्ता महानगरपालिका निवडणुकांमध्ये असेल असा विश्वास व्यक्त करून महाविकास आघाडी वरती जोरदार हल्लाबोल करताना उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीकडे कोणताही ठोस विचार नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.
२०१९ मध्ये शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यांच्या कडे कोणतेही वैचारिक अधिष्ठान नव्हते. त्यामुळेच यंदा तर त्यंच्यातुनही काँग्रेस बाहेर पडुन फुट फटली आहे. या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दिसणार आहे. आम्ही या निवडणुकीत महायुतीचा प्रयत्न केला. मात्र स्थानीक पातळीवर काही अडचणी आल्या. मात्र वरीष्ठ पातळीवर एकमत कायम आहे. आम्ही मित्र पक्षावर टिका करणार नाही. विकास याच मुद्यावर ही निवडणुक लढवली जाईल. यावेळी त्यांना स्थानीक पदाधाकार्यांची नाराजी लवकरच दुर होईल. येत्या दहा दिवसात केवळ महापालीका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले जाईल. पक्षांतर्गत नाराजी राहणार नाही. ज्यांनी रोष व्यक्त केला. ती साहजिक होती. घरातील वाद होता. तो आता मिटला आहे. असे ते सांगीतले.
राज्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजी वरती बोलताना ते म्हणाले की आठ नऊ वर्षाचे अंतर पडलेले आहे जणू एक पिढी आणि दुसरी पिढी यांच्यामधील अंतर या निमित्याने समोर आले आहे दोन पिढीच विचार आणि त्यांची कार्यपद्धती यामुळे हे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले आहेत कोणीही आपल्या आईवर नाराज होत नाही तसं भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांची आई आहे त्यामुळे कार्यकर्ते आता झालं गेलं विसरून प्रत्यक्ष कामाला लागले आहेत विनाकारण काही जण या गोष्टींचे भांडवल करीत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.