माजी PCMC आयुक्त राजेश पाटील यांचे अजितदादांनी केले तोंड भरून कौतुक; म्हणाले, मी अत्यंत कार्यक्षम आणि चांगला अधिकारी दिला होता, ज्याने पालिकेतील भ्रष्टाचार निपटून काढला आणि PCMC ला शिस्त लावली; शहर अतिक्रमण मुक्त केले, आता शहर गलिच्छ, सर्वत्र अतिक्रमण अन् वाहतुकीची कोंडी!
* IAS राजेश पाटील गेल्यानंतर, “भाजपच्या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झाली असून, शहरात लूट करणाऱ्यांच्या टोळ्या खुलेआम वावरत आहेत.” – अजितदादाविक्रांत पाटील
PCMC मध्ये आपण राजेश पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अन् जनताभिमुख अधिकारी दिला. त्यांनी महापालिकेचा कारभार पारदर्शी अन् स्वच्छ केला, प्रशासनिक भ्रष्टाचार निपटून काढला. असे अनेक चांगले अधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये देऊन आपल्या काळात महापालिकेला एका वेगळ्या उंचीवर नेल्याचे अजितदादांनी सांगितले. मात्र, त्यांचा सारा रोख नंतर भाजपने PCMC च्या कारभाराची वाट लावण्यावर होता. आपल्या काळात राजेश पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. त्यांनी खमका आणि नेमका कारभार केला. पूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे असलेल्या ४ हजार ८४४ कोटी रुपयांच्या ठेवी, भाजपने आता २ हजार कोटींवर आणून ठेवल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या होत्या, त्या कमी झाल्या, भाजपने महापालिका कंगाल केली. पूर्वीच्या सत्तेत, राजेश पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या काळात होत असलेली सर्वसामान्य जनतेच्या हिताची जोरदार विकासकामे आणि नंतर भाजपाच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार, कंत्राटराज, मुजोर अन् शिरजोर अधिकारी अशी मांडणी अजितदादांनी केली.
* पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अजितदादांनी भाजपकडून झालेला सत्तेचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचे वाभाडे काढले.
“भाजपची राक्षसी भूक, मनपाची वाट लावली!”
* “भाजपच्या काळात ‘रिंग’ करून पैसे लाटले गेले, रस्ते अरुंद केले गेले आणि त्यामुळेच शहरात वाहतूक कोंडी वाढली. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही.”
* “शहरातील काही विशिष्ट लोकांची संपत्ती इतकी कशी वाढली? त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून?”
भाजपला सत्तेची मस्ती, माज आणि नशा!
* “भाजपला सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलीये. यांनी कुत्र्याच्या नसबंदीतही पैसे खाल्ले, अरे कशात पण पैसे खाल्लेत. महापालिकेची अक्षरशः धुलाई केली. आता अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांवर दबाव आणले गेले.”
* “विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन महापौरांवर झाला. आता त्या माजी महापौर भाजपच्या उमेदवार आहेत.”
* “पिंपरीत आधीच जमीन आणि भंगार माफिया सक्रिय असताना आता ‘खोदाई माफिया’ अवतरले आहेत. अर्बन स्ट्रीटच्या नावावर अतिक्रमण, हफ्तेखोरी सुरू झाली आहे. शहरात लुटारूंच्या टोळ्या भरदिवसा वावरत आहेत. भ्रष्टाचारामुळे पिंपरी महापालिका पर बरबटली आहे.”

(विक्रांत पाटील)
8007006862 (SMS फक्त)
9890837756 (व्हॉटस्ॲप)
_Vikrant@Journalist.Com