कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 3 मधून शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका हर्षाली चौधरी थविल निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी सुरवात केली असून मतदारांशी संवाद साधून शिवसेनेतर्फे केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. यावेळी शिवसेना उपशहर संघटक विलास रंदवे, विजय चौधरी, रमेश पाटील आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कायकर्ते उपस्थित होते.