शिवसेना भाजपा महायुतीचे प्रभाग क्र. ४ ब चे अधिकृत उमेदवार मयूर पाटील यांना मतदारांच्या भेटीगाठींना जनतेचा प्रचंड प्रतिसाद 

0

कल्याण : शिवसेना भाजप महायुतीचे प्रभाग क्र. ४ ब चे स्थानिक उमेदवार मयूर पाटील यांनी रविवारी माताजी मंदिर बाल्यानी टेकडी परिसर ते गुप्ता चाळ येथे डोअर टू डोअर प्रचार केला. यावेळी नागरिकांसोबत त्यांनी भेटीगाटी घेतल्या. तसेच त्यांच्या रॅलीला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मयूर पाटील हे सध्या आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागरिक बहुसंख्येने त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसले. तसेच प्रभाग क्रमांक 4क स्थानिक उमेदवार नमिता मयूर पाटील यांनी ,मोहने, फुले नगर, आदी परिसरात डोअर टु डोअर प्रचार सोमवारी करीत , महिला वर्गासह ,नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या समर्थनासाठी तळागाळातील महिला वर्ग आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते. तसेच प्रभाग क्रं4 ड शिवसेना भाजपा युतीचे चे उमेदवार रोहन कोट, तसेच प्रभाग क्रमांक 4 पुजा अश्विन जोगदंड यांनी देखील डोअर टु डोअर प्रचारात गती घेतल्याचे दिसत असल्याने प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना भाजपा महायुतीती पँनल च्या उमेदवारांनी प्रचार जोरदार पणे सुरू असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech