ठाकरे गटातील नाराजांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश

0

 

प्रभाग क्र. २ मध्ये शिवसेनेची ताकद वाढली

कल्याण : ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

कल्याण मधील प्रभाग क्र. २ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जुने जाणते शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर उमेदवारी देतांना अन्याय झाला आहे. जे नवीन एक दीड वर्षापूर्वी आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी देण्यात आली असून प्रचार करतांना जुन्या कार्यकर्त्यांना ते विचारात घेत नव्हते. निवडणुकीच्या नियोजनाबाबत विचारणा केली जात नव्हती. पदाधिकार्यांना सन्मानाने वागवत नसल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटातील उपविभागप्रमुख रवींद्र मोरे, संतोष जाधव, उपविभाग संघटक अरुण राऊळ यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून शिवसेना उमेदवार अनघा राजेंद्र देवळेकर यांना पाठींबा दिला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, उमेदवार अनघा देवळेकर, शाखाप्रमुख भावेश अवसरे, उपशहरसंघटक नितीन जाधव, उपशाखा प्रमुख प्रवीण खराटे, महिला शाखा प्रमुख शिल्पा शेडगे, महिला शाखाप्रमुख रेखा दामोदर, युवासेना शाखाप्रमुख समीर सलमानी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे जुने सहकारी शिवसेनेत आल्याने सर्वांना आनंद झाला असून त्यांच्या येण्याने आमची ताकद वाढली असून आणखी कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी संपर्कात असल्याचे अनघा देवळेकर यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech