प्रभाग क्र. ५ ब मध्ये महायुतीचे किरण भांगले शिवसेनेतर्फे मैदानात;
सुशिक्षित उमेदवार किरण भांगले यांचा विकासाचा अजेंडा
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. रॅली, प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. अशातच प्रभाग क्र. ५ ब मधून शिवसेना–भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण राजाराम भांगले निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. एक सुशिक्षित आणि सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे.
विकासाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करताना किरण भांगले यांनी सांगितले की, “मी स्वतः एक सामान्य शिवसैनिक असून वयाच्या १२–१३ व्या वर्षापासून शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सोबत शिवसेनेचं काम करत आहे. आज जेव्हा मी नागरिकांशी संवाद साधतो, तेव्हा ते माझ्या आतापर्यंतच्या कामावर समाधानी असल्याचे दिसते. मात्र एवढ्यावर न थांबता अजूनही अनेक विकासकामे करायची आहेत.” पुढील काळात प्रभागाच्या विकासासाठी आयटी हब उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रोजगारनिर्मिती, युवकांना संधी आणि आधुनिक विकास हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.