पॅनल क्र. ३ मध्ये हर्षाली चौधरी थविल यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्र. ३ मध्ये भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार ॲड. हर्षाली चौधरी थविल यांचा प्रचार दौरा आज आंबिवली अटाळी परिसरात पार पडला. आज प्रचाराचा ११ वा दिवस असून मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. तसेच यावेळी नागरिकांना प्रभागात मतदान कसे करायचे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. मूलभूत सुख सुविधांवर हर्षाली चौधरी थविल यांचा भर आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे यावेळी हर्षाली चौधरी थविल यांनी सांगितले.
महापालिकेच्या मागील कार्यकाळात नगरसेविका असतांना केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे पक्षाने आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली असून लोकांच्या पायाभूत सुख सुविधांचा प्रश्न आधी देखील सोडवला असून यापुढे देखील सोडविणार आहे. एक महिलाच महिलांच्या समस्या समजू शकते, पाणी गटार नाले या समस्या सोडविल्या असून यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील भरघोस निधी दिला आहे. महायुती सरकारकडून प्रभागासाठी ७ कोटींचा निधी आणला असून यापुढे देखील सरकारच्या माध्यमातून निधी आणून प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे हर्षाली चौधरी थविल यांनी सांगितले.