संभाजीनगरवर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे -उद्धव ठाकरे

0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली. संभाजीनगरचा रखडलेला विकास, पाण्याचा प्रश्न, शेतकऱयांकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांची ब वक्तव्ये अशा सर्वच मुद्दयांना हात घातला . शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘संभाजीनगरवर शिवसेनाप्रमुखांचं अलोट प्रेम होतं. अशा संभाजीनगरमध्ये लोकसभा व विधानसभेत शिवसेनेचा पराभव झाला हे शल्य आहे. हे मला लागलंय. मात्र आपलं एक नातं आहे. तुमचं प्रेम कायम आहे हे दिसत आहे. प्रेम नसतं तर काही नसताना हे मैदान भरलंच नसतं. या बळावरच आपण नवी सुरुवात केली आहे. ज्यांना दिलं, त्यांनी खाल्लं आणि माजले, गद्दार झाले. पण माझे काही बिघडलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘जे केले आहे ते तुमच्यापुढे आहे, जे करणार आहे ते वचननाम्यात आहे. त्यामुळे संभाजीनगरवर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. विजयाच्या सभेत राजलाही सोबत घेऊन येईन,’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजीनगरला नशामुक्त करण्याचे आश्वासन देणारे अजित पवार यांची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘तुम्हालाच सत्तेची नशा चढली आहे. तुम्ही काय इतरांना नशामुक्त करणार राज्यात सरकार असताना संभाजीनगरला नशामुक्त करू शकला नाहीत, आता महापालिका हाती घेऊन कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. ‘संभाजीनगरमध्ये प्यायला पाणी मिळत नाही, पण दारूचे परवाने पटापट मिळतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गुंठेवारी, एमआयडीसी, शाळा, रस्ते सुधारणा, कचरा हे विकासाचे मुद्दे अंबादास दानवे यांनी मांडले. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची ही भाषण झाले

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech