रेकार्ड ब्रेक !श्री रेणुका देवी संस्थानला एक महिन्यात एक कोटीवर उत्पन्न

0

नांदेड : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थानसाठी डिसेंबर महिना उत्पन्नामध्ये रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. एक महिन्यात तब्बल एक कोटी १४ लक्ष २९ हजार ८९९ रुपये रोख उत्पन्न, तर चार किलो ४११ ग्रॅम ७८० मिली चांदी व ११८ ग्रॅम सोने दान स्वरूपात मिळाले आहे. श्री रेणुका देवी संस्थानच्या कार्यालयात संस्थानातील एकूण ११ दानपेट्या उघडण्यात येऊन त्याची मोजदाद करण्यात आली. सदरील दानपेटीत २५ लक्ष ३२ हजार ३९८ रुपये रोख रक्कम निघाली. तसेच ९६ ग्राम ५०० मिली सोने, सोन्याची नथ ४७, व दोन किलो २१० ग्रॅम चांदीचे दागिने प्राप्त झाले.

गेल्या ३० दिवसांमध्ये देणगी काउंटरवर ३८ लक्ष ५१ हजार २२४ रुपये, साडी पातळ विक्रीतून २४ लक्ष ३४ हजार ५३० रुपये, ऑनलाइन देणगीतून २६ लक्ष २ हजार ७४७ रुपये, व दानपेटीतून२५ लक्ष ३२ हजार ३९८ रुपये, असे एकूण एक कोटी १४ लक्ष २० हजार ८९९ रुपये उत्पन्न संस्थानला झाले. दानपेटीतून ९६ ग्रॅम ५०० मिली सोने व पावतीवर आलेले २१ ग्रॅम पाचशे दहा मिली सोने, असे एकूण ११८ ग्रॅम सोने प्राप्त झाले आहे. दानपेटीतून दोन किलो २१० ग्रॅम चांदी व पावतीवर दोन किलो १०१ ग्रॅम ७८० मिली चांदी, असे मिळून एकूण चार किलो ४११ ग्रॅम ७८० मिली चांदी दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. सदरील दानपेटीची मोजदाद तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत, प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे, सहा. व्यवस्थापक नितीन गेडाम यांच्या उपस्थितीत पार पडली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech