मराठी सिने अभिनेते प्रसाद ओक आणि मंगेश देसाई यांनी साधला मतदारांशी संवाद

0

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना पक्षाच्या वतीने मराठी सिने अभिनेते धर्मवीर चित्रपटातील कलावंत प्रसाद ओक वमंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथील मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला‌ शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मराठी नेते व धर्मवीर प्रेम प्रसाद ओक व मंगेश देसाई यांच्या उपस्थितीत जोशपूर्ण भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शहराच्या विकासासाठी शिवसेनाच सक्षम पर्याय असल्याचा ठाम संदेश या सभेतून देण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की,येणाऱ्या महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech