कॅम्पसचा अ‍ॅथलिजर परिधान क्षेत्रात प्रवेश; तरुणांच्या आत्मअभिव्यक्तीसाठी नवे व्यासपीठ

0

नाशिक : आघाडीच्या क्रीडा व अ‍ॅथलिजर फुटवेअर ब्रँडपैकी एक असलेल्या कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअरने आज अ‍ॅथलिजर परिधान (Athleisure Apparel) श्रेणीत प्रवेश केल्याची घोषणा केली. ब्रँडच्या तत्त्वज्ञानाचा नैसर्गिक विस्तार म्हणून हा प्रवेश होत असून, तरुणांच्या आत्मअभिव्यक्तीसाठी अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. कॅम्पसच्या यशस्वी प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, नवकल्पना आणि विविधीकरणाबाबतची कंपनीची बांधिलकी यातून अधोरेखित होते.

कॅम्पस भारतातील तरुणाईच्या धाडसी, विविधांगी आणि सातत्याने बदलणाऱ्या मानसिकतेचा उत्सव साजरा करते. महत्त्वाकांक्षा आणि विश्रांती, शिस्त आणि स्वाभाविकता, व्यक्तिमत्त्व आणि समुदाय यामधील संतुलन साधत तरुणाई दररोज पुढे जात असते. अ‍ॅथलिजर परिधान क्षेत्रातील प्रवेश या विचारधारेचेच प्रतिबिंब असून, “मूव्ह युवर वे” या कॅम्पसच्या मूळ तत्त्वज्ञानाचा विस्तार अशा कपड्यांमध्ये करण्यात आला आहे, जे तरुणांना कोणत्याही एकाच भूमिका, क्रिया किंवा ओळखीपुरते मर्यादित न ठेवता स्वतःची ओळख व्यक्त करण्याची मुभा देतात.

दैनंदिन वापरासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या अ‍ॅथलिजर परिधान श्रेणीत पुरुष व महिलांसाठी पोलो टी-शर्ट, राऊंड नेक टी-शर्ट, जॅकेट्स, जॉगर पँट्स आणि कॅप्स यांचा समावेश आहे. विविध डिझाइन्स, रंग आणि आकारांमध्ये उपलब्ध असलेली ही श्रेणी ५९९ रुपयांपासून सुरू होऊन १,८९९ रुपयांपर्यंत आहे, ज्यामुळे व्यापक ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

दैनंदिन आरामाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या परिधानांमध्ये बहुपयोगी डिझाइन्स आणि वैशिष्ट्यांचा समावेश आहे. अँटी-ओडर व अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे दिवसभर ताजेपणा टिकून राहतो, तर टू-वे स्ट्रेचमुळे मोकळी हालचाल शक्य होते आणि परिधानाचा एकूण अनुभव अधिक चांगला बनतो. स्वच्छ सिलोएट्स, बहुपयोगी स्टायलिंग आणि आधुनिक रंगसंगतीमुळे हे कलेक्शन वर्कआउट, प्रवास तसेच कॅज्युअल भेटींसाठी सहज वापरता येईल, असे आहे.

या लॉन्चबाबत बोलताना कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअरचे होल टाइम डायरेक्टर आणि सीईओ श्री. निखिल अग्रवाल यांनी सांगितले की, “अ‍ॅथलिजर परिधान बाजारात प्रवेश करणे हा आमचा धोरणात्मक व्यावसायिक निर्णय असून, यामुळे आमचा बाजार विस्तारेल, विद्यमान ग्राहकवर्गातून अतिरिक्त महसूल निर्माण होईल आणि त्याचबरोबर हालचाल व आत्मअभिव्यक्ती या कॅम्पसच्या मूळ ब्रँड तत्त्वज्ञानाशी आम्ही प्रामाणिक राहू. या लॉन्चमुळे ब्रँडचे पोर्टफोलिओ विस्तारले असून, आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने देण्याबाबतची आमची बांधिलकीही अधोरेखित होते.”

सध्या ही अ‍ॅथलिजर परिधान श्रेणी कॅम्पसच्या एक्सक्लुझिव्ह ब्रँड आऊटलेट्स, ब्रँडच्या डी2सी वेबसाइट तसेच अ‍ॅमेझॉन आणि मिंत्रा यांसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. अ‍ॅथलिजर परिधान क्षेत्रातील या प्रवेशासह, कॅम्पसने तरुणांच्या दैनंदिन जीवनाला पाठबळ देण्याची आपली बांधिलकी अधिक बळकट केली असून, आत्मविश्वासपूर्ण आत्मअभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्व आणि “मूव्ह युवर वे” या संकल्पनेचा दररोज पुरस्कार करण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech