राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली गटस्थापना

0

अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे १२ नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठामपा गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या १२ नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. ठाणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. दरम्यान, माजी विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अश्रफ शानू पठाण हे ठाणे महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदही भूषविले आहे. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक ३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपले पॅनल त्यांनी मोठ्या फरकाने जिंकले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech