२७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेते पदाची नियुक्ती

0

ठाणे : ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या २७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे. असंही डावखरे म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावे, भाजप पक्षामध्ये देखील sc प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech