भुसावळ ते नागपूर विशेष मेमू रेल्वे धावणार

0

जळगाव : प्रवाशांची वाढती गर्दी पाहता तसंच प्रवाशांची होणारे गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी पूर्णतः अनारक्षित असून विदर्भ आणि खानदेश या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गावरून हजारो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक रेल्वे ठरणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११०१ ही अनारक्षित भुसावळ नागपूर मेमो विशेष गाडी शनिवारी सात वाजून पन्नास मिनिटांनी भुसावळ येथून सुटेल आणि नागपूर येथे दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११०२ नागपूर भुसावळ विशेष मेमु गाडी त्याच दिवशी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी नागपूरहून सुटून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी भुसावळ येथे पोहोचणार आहे. या विशेष गाडीला दोन्ही मार्गावरील बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, बोरगाव, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा आणि अजनी या १३ स्थानकांवर थांबे असणार आहेत. या विशेष रेल्वेमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना नागपूर व भुसावळ कडे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लग्नसराई तसेच सण उत्सवांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांना होणारे प्रचंड गैरसोय म्हणून ही विशेष सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech