रायगड : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती रंगल्या. काही मतदारसंघांत मोजक्या मतांनी विजय मिळाला तर काही ठिकाणी उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषद कळंब मतदारसंघात नारायण डामसे यांनी ११०८३ मते मिळवत हरिश्चंद्र निरगुडा (१०८४९) यांचा २३४ मतांनी पराभव केला. कशेळे मतदारसंघातून वर्षा सुरेश दोरे (१२७५२) या ३७१९ मतांनी विजयी झाल्या. नेरळ मतदारसंघात सुनिता रोहिदास मोरे (१०७४७) यांनी सुनिता सुरेश टोकरे (९८६४) यांच्यावर ८८३ मतांची आघाडी घेतली. कडाव मतदारसंघात मारुती घारे (११२७८) यांनी योगेश कांबेरे (९३२३) यांचा १९५५ मतांनी पराभव केला.
माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढतीत सुवर्णा प्रदीप ठाकरे (८७१४) यांनी रेश्मा योगेश मिसाळ (८६९५) यांना अवघ्या १९मतांनी मागे टाकले, तर राधिका किशोर ठाकरे यांना ५०७८ मते मिळाली. मोठे वेणगाव मतदारसंघात उषा अंकुश ठोंबरे (१३१४२) यांनी ५५४७ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पंचायत समिती पोशिर मतदारसंघात रेश्मा जोशी (५८५७) या ९७४ मतांनी विजयी ठरल्या. कळंबमध्ये कमलाबाई शिंगवा (६४७५) यांनी १७४७ मतांची आघाडी घेतली. पाथरज मतदारसंघात कविता भरत पादिर (६८३६) या १९७१ मतांनी विजयी झाल्या. कशेळे येथे अक्षय राम तिटकारे (५६८९) यांनी १४१९ मतांनी विजय मिळवला.
नेरळ पंचायत समिती मतदारसंघात भगवान चंचे (६९९५) यांनी मोठी आघाडी घेत नम्रता कांदळगावकर, असिफ अत्तार व उषा कृष्णा पारधी यांना मागे टाकले. दामत मतदारसंघात महेश खारीक (४७०३) हे ११९० मतांनी विजयी झाले. वाकस येथे नितिन धुळे (५४९८) यांनी १०१४ मतांनी विजय मिळवला. कडाव मतदारसंघात सुषमा चेतन पवाळी (५६५६) या ६९९ मतांनी पुढे राहिल्या. माणगाव तर्फे वरेडी पंचायत समितीत महेश सुरेश विरले (५९८०) यांनी १७८ मतांनी विजय मिळवला. उक्रुळ येथे नमिता लहु श्रीखंडे (५५१९) या २७४९ मतांनी विजयी झाल्या. मोठे वेणगाव मतदारसंघात चित्रा जगदीश ठाकरे (५१०८) यांनी ६१७ मतांनी आघाडी घेतली. बीड बुद्रुक मतदारसंघात नमिता सुधाकर घारे (७९७०) यांनी ४५०८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.