इस्त्रोने चंद्रयान-४ साठी साउथ पोलजवळ सुरक्षित लँडिंग साइट निवडली

0

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आपल्या आगामी चंद्र मोहिमेसाठी, चंद्रयान-४ साठी चंद्राच्या साउथ पोलजवळील सुरक्षित लँडिंग साइट निश्चित केली आहे. शास्त्रज्ञांनी मॉन्स माउंटन (एमएम-४) क्षेत्र लँडिंगसाठी सर्वात योग्य म्हणून निवडले आहे, जे चंद्राच्या साउथ पोलजवळ सुमारे ६ हजार मीटर उंचीवर असून पृष्ठभाग जवळजवळ सपाट आहे. इस्त्रोच्या मते, एमएम-४ साइटची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. हा भाग उतार अनुकूल अससून इथे सरासरी उतार ५ डीग्री असून लँडर डीग्रीपर्यंत सुरक्षित उतरू शकतो. तसेच मोठ्या खडकांचा धोका कमी आहे. याठिकाणी बहुतेक खडे ०.३ मीटरपेक्षा लहान असल्यामुळे लँडिंगसाठी सुरक्षित आहे. तसेच इथे सलग ११-१२ दिवस सूर्यप्रकाश, सौरऊर्जा आणि ऑपरेशन्ससाठी फायदेशीर परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे इथे रेडिओ कम्युनिकेशन स्थिर राहत असल्यामुळे पृथ्वीशी स्पष्ट संपर्क साधता येतो. त्याशिवाय इथे बर्फाची शक्यता असल्याने भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त आहे.

या संशोधनाचे निष्कर्ष Lunar and Planetary Science Conference (LPSC २०२६) मध्ये सादर केले गेले. लँडिंग साइट निवडण्यासाठी चंद्रयान-२ च्या ऑर्बिटरवरील उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्याचा उपयोग केला गेला, ज्यामुळे पृष्ठभागाची सखोल माहिती मिळाली. ‘मून मिशन-४’ चंद्रावरून खडक आणि मातीचे नमुने गोळा करून पृथ्वीवर परत येईल. या २१०४ कोटी रुपयांच्या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र रॉकेट्स आणि अवरोही, आरोही, प्रणोदन, स्थानांतरण व पुनःप्रवेश मॉड्यूलचा वापर केला जाणार आहे. अवरोही व आरोही मॉड्यूल चंद्रावर उतरून नमुने गोळा करतील आणि नंतर पृथ्वीवर परत पाठवतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech