शिवसेनेचे निवेदन देऊन आंदोलन
मालेगाव : उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून मालेगाव मधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहे यावरूनच शुक्रवारी शिवसेना आणि उपमहापौर यांच्यात जोरदार संघर्ष झाला जर सोमवार पर्यंत फोटो निघाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा उबाठा यांच्या शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये इस्लाम पक्षाचे सत्ता असून हा स्थानिक पक्ष आहे या ठिकाणी सत्तेसाठी इस्लाम पक्षाने समाजवादी पक्षाला मदतीला घेऊन समाजवादी पक्षाला उपमहापौर तर इस्लाम पक्षाकडे महापौर पद ठेवले.
इस्लाम पक्षाच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान चा फोटो लावला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव मधील शिवसंग्राम, शिवसेना उबाठा यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि या संघटनांनी उपमहापौरांनी टिपू सुलतानचा फोटो तातडीने काढावा अशी मागणी केली या मागणीकडे दोन दिवसापासून उपमापोर शान ए हिंद या दुर्लक्ष करत होत्या त्यामुळे याबाबत शुक्रवारी मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. उबाठा सेनेने घटनेचा निलेश आहेर याच्या नेतृत्वाखाली उपमहापौर यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांनी हा फोटो काढावा अशी मागणी केली याबाबतचे पत्र मालेगाव महानगरपालिकेचे नगर सचिवांना देखील देण्यात आलेला आहे यावरती मालेगावच्या उपमहापौरानी नकार दिल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या वतीने उपमहापौरांवरती जातीय सलोखा बिघडवण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. आणि हा फोटो काढावा अन्यथा सोमवारी उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर यांनी दिला आहे. तर या सर्व प्रश्नावरती मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी सांगितले की मी उपमहापौर झाल्यानंतर मला काही जणांनी हा फोटो भेट दिला आणि मी तो माझ्या दालनामध्ये लावला यामध्ये वाईट काय झाले टिपू सुलतान हे एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे त्यांच्या फोटोचा मी आदर केला आहे असे त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना सांगितले.