पुणे-पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा

0

पुणे : पोलीस परवानगी न घेता जंगली महाराज स्त्यावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या एका संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. जंगली महाराजा रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात सकाळी एका संघटनेकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करण्यासाठी संबंधित संघटनेकडून पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलीस परवानगी न घेता आंदोलन केल्या प्रकरणी पोलिसांनी २३ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना डेक्कन पोलीस टाण्यात आणले. पोलिसांनी त्यांनी नोटीस बजावून सोडून दिले. याबाबत पोलीस हवालदार नलिन येरुणकर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शन पाहण्यासाटी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संंबंधित संस्थेकडून आयाेजित करण्यात आलेल्या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech