मुंबई : ज्येष्ठ पत्रकार व समाज सेवक दिलीप मालवणकर यांनी आज आपल्या अनोख्या दातृत्व गुणाचा प्रत्यय दाखवून समाजा पुढे अनोखा आदर्श निर्माण केला. गेल्या पाच फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी प्रांघस्तक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना जबर मारहाण झाल्याने हात, पाय, छाती व पोटावर मार लागला. तसेच खांद्याचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली होती.
याही अवस्थेत त्यांना शाळा नं. १४ जवळील एका रिक्षा चालकाचे घर जळून घरातील सर्व समान, कपडेलात्ते जाळून गेले. सदर बनकर या रिक्षाचालकाची अवस्था बघून अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मालवणकर यांनी स्वखर्चाने स्वयंपाक घरातील सर्व भांडी, शेगडी, दोन महिने पुरेल इतके किराणा व जीवनपयोगी साहीत्य, कुटुंबासाठी कपडे, टॉवेल, चादरी असे साहित्य आज रोजी समितीच्या वतीने रामेश्वर गवई, राजेश फक्के, शशिकांत दायमा, राजेश जगताप आदीच्या हस्ते रिक्षा चालक बनकर यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केले.
या मदतीमुळे बनकर कुटुंबीय भारावून गेले व त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्या मुळे दिलीप मालवणकर स्वतः जखमी असतानाही एका गरीब रिक्षा चालकाच्या कुटुंबीयास जो मदतीचा हात दिला त्याबद्दल मालवणकर यांच्या दातृत्वाची शहरात चर्चा होतं आहे. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधी ने मदत दिली नसताना दिलीप मालवणकर यांच्या नेतृत्वाखालील अन्याय विरोधी समितीने हे मानवतावादी करा केले, त्याचे कौतुक होत आहे.