एआय शिखर परिषदेदरम्यान युवक काँग्रेसचे हिंसक आंदोलन, निदर्शक पोलिसांच्या ताब्यात

0

नवी दिल्ली : एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणारे काही कार्यकर्ते आंदोलनादरम्यान शर्ट काढून घोषणाबाजी करताना दिसले. भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या विरोधात संतप्त आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्ते भारत मंडपमच्या विविध पॅव्हेलियनमध्ये जाऊन निदर्शने करत होते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट काढून ‘पीएम इज कॉम्प्रोमाइज’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. सरकारी अधिकारी, उद्योगक्षेत्रातील नेते आणि परदेशी प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अशा प्रकारचे आंदोलन रोखण्यासाठी आंदोलनकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन घटनास्थळावरून दूर नेण्यात आले.

दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये भारतीय युवा काँग्रेसने म्हटले आहे की, “जेव्हा परराष्ट्र धोरणात झुकाव, कॉर्पोरेट दबाव आणि शांतता दिसते, तेव्हा स्पष्ट होते की पीएम मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत. हीच सत्यता उघड करण्यासाठी भारतीय युवा काँग्रेसचे जाबांज कार्यकर्ते एआय समिटमध्ये पोहोचले आणि ‘कॉम्प्रोमाइज्ड पीएम’विरोधात आंदोलन केले. देशाच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड होणार नाही. इन्कलाब जिंदाबाद.” या आंदोलनावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech