छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात चकमकीत महिला नक्षलवादी ठार

0

रायपूर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात आज, सोमवारी सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी कमांडर ठार करण्यात आली. ही घटना छोटेबेठिया पोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरात घडली. सदर महिला कमांडरचे नाव रूपी असून तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुरक्षादलांची एक टीम नक्षलविरोधी मोहिमेसाठी जंगल भागात गस्त घालत होती. त्यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात कपांडर रूपी ठार झाली. घटनास्थळाहून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह आणि एक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. दरम्यान ३१ मार्च रोजी राज्य सरकारने छत्तीसगडला सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त राज्य घोषित केल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत ही चकमक झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech