महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना राजकीय नुकसान होईल – पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी (१६ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोधी खासदारांचा पाठिंबा मागितला आणि सांगितले कि, विरोध करणाऱ्याला त्याची किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांना त्याचा फटका बसणार आहे.” अखिलेश यादव आणि धर्मेंद्र यादव यांचा संदर्भ देत ते म्हणाले, “हे खरं आहे की मी अतिमागास समाजातून आलो आहे. अखिलेशजी माझे मित्र आहेत, त्यामुळे कधी-कधी मदत करतात. मी अतिमागास समाजातून आलो असलो तरी संविधानाने आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा मार्ग दाखवला आहे.

देशातील नारीशक्ती आमच्या निर्णयाबरोबरच आमच्या नीयतीलाही पाहील. २०२३ मध्ये जेव्हा यावर चर्चा सुरू होती, तेव्हा सगळेच म्हणत होते की लवकर करा. २०२४ मध्ये अंमलबजावणी शक्य नव्हती, पण २०२९ मध्ये संधी आहे. वेळेची गरज आहे की आपण अधिक विलंब करू नये.”ते पुढे म्हणाले, “आपल्या देशात महिला आरक्षणावर चर्चा सुरू झाल्यापासून आणि त्यानंतर जेव्हा-जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा या अधिकाराला विरोध करणाऱ्यांना महिलांनी माफ केलेले नाही. २०२४ च्या निवडणुकीत असे झाले नाही, कारण तेव्हा सर्वांनी एकमताने हे विधेयक मंजूर केले होते, त्यामुळे हा मुद्दाच राहिला नाही.”

पंतप्रधान मोदी यांनी असेही म्हटले, “जर आपण सगळे एकत्र आलो, तर इतिहास साक्षी आहे की याचा फायदा कुठल्याही एका राजकीय पक्षाला होणार नाही. याचा फायदा देशाच्या लोकशाहीला होईल, देशाच्या सामूहिक निर्णयक्षमतेला होईल आणि आपण सगळे त्या यशाचे हक्कदार असू. ना खजिना पक्ष त्याचा हक्कदार असेल, ना मोदी त्याचा हक्कदार असेल. त्यामुळे ज्यांना यात राजकारणाचा वास येतो, त्यांनी मागील ३० वर्षांचे परिणाम पाहावेत. त्यांचाही फायदा यातच आहे. जे नुकसान होत आहे त्यापासून ते वाचतील. म्हणून याला राजकीय रंग देण्याची गरज नाही.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech