काउंटो मोटर्स मडगाव दक्षिण गोव्यातील वेगाने विकसित होणाऱ्या लक्झरी केंद्रात मर्सिडीज-बेंझ ग्राहकांसाठी जागतिक दर्जाची सेवा आणि मालकी अनुभव सादर करते
गोवा: भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने आज गोवा येथील मडगावमध्ये अत्याधुनिक लक्झरी सेवा सुविधा केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली. यामुळे ब्रँडचा नवीन आणि उदयोन्मुख प्रदेशांमध्ये विस्तार होत असून मजबूत ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट होत आहे. हे नवीन सुविधा केंद्र जलद विकसित होणारे लक्झरी ग्राहक केंद्र असलेल्या दक्षिण गोव्यात मर्सिडीज-बेंझचा ठसा लक्षणीयरीत्या मजबूत करत आहे. भारतातील प्रमुख वाढीच्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत वैशिष्ट्यपूर्ण सेवा सहाय्य पुरविले जात आहे.
काउंटो मोटर्स मडगावच्या उद्घाटनासह मर्सिडीज-बेंझ आता दक्षिण गोव्यातील वाढत्या ग्राहकवर्गाला ब्रँडच्या प्रसिद्ध सेवा मानकांसह सेवा देईल. त्यायोगे ग्राहकांना आता त्यांच्या घराजवळ अखंड, सोयीस्कर आणि त्रासमुक्त असा ओनरशिप अनुभव घेता येईल. काउंटो मोटर्स मडगाव हे गोव्यातील काउंटो मोटर्सचे दुसरे मर्सिडीज-बेंझ सुविधा केंद्र आहे. सध्या उत्तर गोव्यातील रिबंदर येथे 3S सुविधा केंद्र कार्यरत आहे. या नवीन सुविधा केंद्राच्या माध्यमातून दक्षिण गोवा प्रदेशातील ब्रँडचा धोरणात्मक विस्तार दिसून येतो. हा भाग मर्सिडीज-बेंझ ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे उपाध्यक्ष शेखर भिडे म्हणाले, “गोवा ही एक महत्त्वाची आणि जलद विकसित होणारी लक्झरी बाजारपेठ असून बदलत्या ग्राहक आकांक्षा आणि मर्सिडीज-बेंझ वाहनांच्या वाढत्या मागणीने आकार घेत आहे. गोव्यात मर्सिडीज-बेंझच्या दुसऱ्या लक्झरी सुविधा केंद्राचे आणि दक्षिण गोव्यातील पहिल्या सेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन करून आम्ही या प्रदेशातील आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत. अधिक चांगला आणि वैयक्तिकृत रिटेल आणि सेवा अनुभव सादर करत आहोत. गोव्यातील ग्राहकांसाठी मर्सिडीज-बेंझच्या विश्वास, प्रतिष्ठा आणि उत्कृष्टतेच्या मूलभूत मूल्यांचे हे खरे प्रतिबिंब आहे.”
काउंटो मोटर्स मडगाव ग्राहकांना आधुनिक लक्झरी सेवा अनुभव सादर करते. यामध्ये 4 सेवा बे – 2 सेवा आणि 2 सहाय्यक बे, सुव्यवस्थित आणि कार्यक्षम कार्यशाळा मांडणीमुळे जलद सेवा टर्नअराउंड सक्षम आहे. XENTRY, स्कायलाईन, OAB, DSD Tab (डिजिटल सर्विस ड्राईव्ह) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित घटकांमुळे वाहनांची अखंड चाचणी, पारदर्शक सेवा प्रक्रिया आणि ग्राहकांना रिअल-टाइम अपडेट्स देता होतात.
जोडीला, समर्पित आणि अनुभवी सेवा सल्लागार वैयक्तिक ग्राहक संवाद सुनिश्चित करतात, तर उच्च प्रशिक्षित मर्सिडीज-बेंझ प्रमाणित तंत्रज्ञ ग्राहकांच्या प्रिय मर्सिडीज-बेंझ वाहनांची सर्वोत्तम काळजी घेतात. हे लक्झरी सेवा सुविधा केंद्र एकूण 8,598 चौरस फूट बांधकाम क्षेत्रावर पसरलेले असून त्यामध्ये 4,307 चौरस फूट कव्हर्ड शोरूम भाग आणि ग्राहक सेवेसाठी समर्पित मोठी सेवा टीम आहे.
काउंटो मोटर्सचे संचालक आकाश खांते म्हणाले, “मडगावमधील नवीन MAR सुविधा केंद्र गोव्यातील आमचे स्थान अधिक मजबूत करत असून आम्हाला दक्षिण गोव्यातील ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहे. प्रीमियम दळणवळणाची वाढती मागणी लक्षात घेता हा विस्तार आम्हाला मर्सिडीज-बेंझच्या जागतिक मानकांनुसार अखंड विना अडथळा विक्री आणि विक्रीपश्चात अनुभव पुरविण्यास सक्षम करतो.”
काउंटो मोटर्स, मडगावची प्रमुख सेवा वैशिष्ट्ये:
• नियमीत देखभाल आणि सर्वसाधारण दुरुस्ती
• स्टार डायग्नोसिस आणि अॅडव्हान्स्ड डायग्नोस्टिक्स
• मूळ, अस्सल सुटे भाग बदलून देणे
• सेवा सल्ला आणि डिजिटल जॉब कार्ड क्रिएशन
• ग्राहकांच्या सोयीसाठी पिक अप आणि ड्रॉप सुविधा
• मर्सिडीज-बेंझ मार्गदर्शक तत्त्वांनुसार वॉरंटी आणि गुडविल पाठबळ सेवा
ब्रँडच्या जागतिक मानकांशी सुसंगत समग्र रिटेल आणि विना अडथळा सेवा अनुभव सादर करत दक्षिण गोव्यात मर्सिडीज-बेंझचा ठसा विस्तारत असल्यामुळे ग्राहकांसाठी प्रवेशयोग्यता सुधारेल. या नवीन सुविधा केंद्रासह डीलरशिप नेटवर्कचा विस्तार करून आणि प्रीमियम ग्राहक अनुभव देण्यासाठी आधुनिक रिटेल पायाभूत सुविधा सादर करत मर्सिडीज-बेंझ गोव्यातील ग्राहकांबरोबर असलेला आपला सहभाग अधिक दृढ करत आहे.