खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा, धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका – मुख्यमंत्री

0

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि त्यानंतर लागोपाठ टीसीएस कंपनीमध्ये धर्मांतरणाचा प्रकार, लैंगिक शोषण, मुंबईतील गोरेगाव नेस्कोतील ड्रग्ज प्रकरणे राज्यासह देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकधील महिला अत्याचार आणि भविष्यवाणी सांगण्याच्या बहाण्यानं अनेकांचीच फसवणूक करणाऱ्या भोंदू ‘अशोक खरात प्रकरणी पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या आहेत. गृह विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी पोलीस महासंचालक, गृह अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यासोबतच नाशिकमधीलच प्रतिष्ठित आयटी कंपनीमध्ये घडलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून असे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन करत ‘इतक्यावर न थांबता आता त्याचा तितकाच दमदार तपास झाला पाहिजे, शिवाय यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही ॲंगल तपासातून सुटू नये, यासाठी प्रयत्न करा. याशिवाय अमरावतीतील परतवाडा प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे, ही गरज व्यक्त करत यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला. तर, मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घेण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech