• या भांडवलासह साही आपल्या तंत्रज्ञान आणि AI स्टॅकमध्ये अधिक सखोल गुंतवणूक करेल, आपल्या प्रॉडक्ट सूटचा विस्तार नवीन ट्रेडिंग श्रेणींमध्ये करेल आणि आपल्या युजर बेसचा विस्तार करेल
बंगळुरू : कामगिरी प्रणीत ट्रेडर्ससाठी तयार केलेला ब्रोकिंग प्लॅटफॉर्म साहीने आज 33 दशलक्ष डॉलरच्या बी सिरीजची फंडिंग राउंड जाहीर केली. त्याचे नेतृत्व अग्रगण्य व्हेंचर कॅपिटल फंड Accel ने केले असून एलीव्हेशन कॅपिटलचा यात सहभाग आहे. Accel च्या समर्पित ग्रोथ फंडमधून आलेली ही ताजी वाढ त्यांच्या ए सिरीजनंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आली आहे. त्यामागे वेगवान उत्पादन नाविन्यपूर्णता, मजबूत ग्राहक स्वीकार आणि प्लॅटफॉर्मवरील वाढती ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी कारणीभूत आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये डेल वाझ आणि मनीष जैन यांनी स्थापन केलेली साही एनएसई आणि बीएसई नोंदणीकृत ब्रोकर्स असून ‘गंभीर रिटेल ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार अधिक चांगल्या सुविधांना पात्र आहेत’ या एका साध्या तत्त्वावर आधारित आहे. ते बाजारात खरी महत्त्वाकांक्षा घेऊन येतात आणि सहा-अंकी मोठ्या टर्मिनल फीशिवाय संस्थांना सहज उपलब्ध असलेली साधने, गती आणि बुद्धिमत्ता यांची मागणी करतात. प्लॅटफॉर्मचा चार्ट-नेटिव्ह इंटरफेस ट्रेडर्सना वेगवेगळ्या साधनांमध्ये स्विच न करता विश्लेषण, निर्णय आणि अंमलबजावणी करण्याची सुविधा देतो. या वर्कफ्लो पर्यायामुळे अनुभवी ट्रेडर्सचा बाजारात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे.
सुरुवातीपासून साहीने आपला संपूर्ण ट्रेडिंग स्टॅक शून्यापासून उभारला आहे — प्रॉप्रायटरी चार्टिंग, ऑर्डर एक्झिक्युशन आणि जोखीम व्यवस्थापनासाठी ऑटोमेशन फीचर्स सक्रिय डेरिव्हेटिव्ह ट्रेडर्समध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत. याचा परिणाम वेगवान वाढीच्या स्वरूपात दिसून आला आहे. यात ट्रेड व्हॉल्यूममध्ये 24 पट वाढ आणि सक्रिय ट्रेडर्समध्ये 19 पट वाढ (एप्रिल 2025 ते मार्च 2026) झाली आहे. या गतीला मजबूत प्लॅटफॉर्म विस्ताराचा आधार आहे. त्यात 13 कोटीहून अधिक ट्रेड्स अंमलात आणले गेले असून, त्यापैकी 86% पेक्षा जास्त एकट्या आर्थिक वर्ष 26 मध्ये झाले आहेत. प्लॅटफॉर्मने ~4 लाख डिमॅट अकाउंट्सही ऑनबोर्ड केले आहेत. त्यातून या फंडिंग राउंडसाठी मजबूत पाया तयार झाला आहे.
सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेल वाझ म्हणाले: “भारतामध्ये 45 दशलक्ष पेक्षा जास्त सक्रिय गुंतवणूकदार अकाउंट्स आहेत, पण बहुतांश सक्रिय ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार अजूनही माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या गुंतागुंतीशी आणि प्रयत्नांशी झुंज देत आहेत. रिटेल गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स स्वच्छ आणि गोंधळमुक्त UI, वेगवान अंमलबजावणी, व्यावसायिक दर्जाची माहिती आणि आत्मविश्वास व स्पष्टतेने ट्रेड करण्यास मदत करणारा प्लॅटफॉर्म अशा अधिक चांगल्या अनुभवासाठी पात्र आहेत यावर आमचा विश्वास असल्याने आम्ही साही तयार केली. हा राउंड आम्हाला त्या दृष्टिकोनावर अधिक खोलवर काम करण्याची संधी देतो.”
सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी मनीष जैन म्हणाले: “प्रत्येक ट्रेडर बाजाराचे विश्लेषण कसे करतो, कधी कृती करतो आणि त्यांना कोणता अडथळा येतो यावर वेगळ्या पद्धतीने काम करतो. साहीमध्ये, आम्ही हे वर्कफ्लोज लक्षात घेऊन अनुमानांऐवजी प्रत्यक्ष अडचणींवर उपाय देणारी प्रॉडक्ट तयार केली आहेत. ट्रेडर्स प्रत्यक्षात जसे काम करतात त्यानुसार तयार केलेले उद्दिष्टाआधारित काम हेच साहीचे वैशिष्ट्य आहे.”
Accel च्या प्रमुख मानसी शाह म्हणाल्या, “भारतामधील सक्रिय रिटेल ट्रेडिंगचा उदय हा चक्रीय नाही तर संरचनात्मक आहे आणि या समुदायाला सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मनी त्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब दाखवले पाहिजे. साही ही एक एआय प्रणीत ब्रोकरेज संस्था ग्राहकांसाठी सर्वोत्तम उत्पादन तयार करण्यात सतत नवे मापदंड स्थापित करत आहे आणि त्यांना यश मिळवण्यासाठी आघाडी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षभरात डेल, मनीष आणि त्यांच्या टीमने उत्पादन नाविन्यपूर्णतेमध्ये प्रभावी वेग दाखवला आहे. Accel मध्ये, आम्ही भारतभरातील ट्रेडर्ससाठी माहिती ते अंमलबजावणी या प्रक्रियेतील वेळ कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्यासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहोत.”
एलीव्हेशन कॅपिटलचे भागीदार वास भास्कर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्ही साहीला एका मजबूत संकल्पनेपासून सक्रिय ट्रेडर्समध्ये अर्थपूर्ण वाढ आणि वापरकर्त्यांचे प्रेम मिळवणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये विकसित होताना पाहिले आहे. डेल, मनीष आणि संपूर्ण टीमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि समज विलक्षण असून ते प्लॅटफॉर्मच्या प्रारंभिक यशातून स्पष्ट दिसते. त्यामुळे साही भारतासाठी अत्याधुनिक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सक्षम स्थितीत असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”