मिरारोड रेल्वे स्थानकात भिकाऱ्यांची सुटका

0

जिल्हा महिला व बालविकास विभागाची कारवाई

ठाणेः मिरारोड रेल्वे स्थानकात काही लहान मुले भीक मागत असल्याची तक्रार जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार या विभागाने ११ मे रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या आदेशाने कारवाई  केली असता, मिरारोड रेल्वे स्थानकात भिक्षा मागताना ४ मुले व २ मुली आढळून आले. या अल्पवयीन बालकांना मुक्त करण्यात आले. नंतर या बालकांची रवानगी बालगृहात करण्यात आली.

ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ठाणे, रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, चाईल्ड हेल्पलाइनच्या श्रद्धा नारकर, अमोल वाघ, मोनिका रणदिवे, रेल्वे सुरक्षा बलचे सावित्री यादव, लोहमार्ग पोलीसचे विवेक पवार यांच्या वतीने करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात आमच्या विभागामार्फत बाल भिक्षेकरीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. अशातच मिरारोड परिसरातील एका व्यवतीने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. बालकांकरवी भीक मागणे, लहान मुलांना त्यासाठी प्रवृत्त करणे कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार कुठे आढळल्यास आमच्या विभागाशी संपर्क साधा.

 -रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech