विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी

0

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सन्माननीय सदस्य आणि पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या एक सन्माननीय सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांचा शपथविधी गुरुवार, दिनांक १४ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.

१) डॉ. नीलमताई गोऱ्हे, ३) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, ३) अंबादास एकनाथराव दानवे, ४) डॉ. प्रज्ञा राजीव सातव, ५) प्रमोद शांताराम जठार, ६) झीशन झिआउद्दीन सिध्दीकी, ७) श्रीमती माधवी संजय नाईक, ८) सुनिल विनायक कर्जतकर, ९) विवेक बिपिनदादा कोल्हे, १०) संजय नथ्थुजी भेंडे

या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांना सभापती महोदय शपथ देतील. या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि श्रीमती सुनेत्राताई पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असून या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या विद्यमान उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे सलग पाचव्यांदा सदस्यत्वाची शपथ घेतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech