मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई; नगरसेवक पदावरही गंडांतर ?

0

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिला. त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हि एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळं मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. परिणामी मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय, त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हि कारवाई करण्यात येत आहे. एकूणच निदा खान ला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं असून मतीन पटेल यांचे नगरसेवकपदही धोक्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतीन पटेल यांनी स्वतःहूनच कारवाई होण्यापूर्वीच घर रिकामं केलं आहे. निदा खान लपवल्याप्रकरणी महापालिकेने अवैध असलेल्या मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची तयारी केली. त्या आधीच मतीन पटेलच्या वतीने स्वतःचे घर पूर्ण रिकामंकरून सामानघराबाहेरकाढलंआहे. अशातच मतीनच्या घरच्या लोकांनी मनपा पथक अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा कारवाईसाठी आले असताना संविधान देऊन आणि फुल टाकून स्वागत केलं. दरम्यान, या तोडककारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील बघायला मिळाला आहे. यावेळी १ डीसीपी, २ एसीपी, ११पीआय, १५ पीएसआय, एपीआय, ८ महिला पोलीस अधिकारी, १२० पुरुष कर्मचारी, ६० महिला कर्मचारी आणि १०० मनपा कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech