सुप्रिया सुळे यांच्या मुलाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून मिळवली ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ची पदवी; सोशल मीडियावर चर्चा

0

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने अमेरिकेतील नामांकित न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी (एनवाययु) मधून ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या विषयात आपली पदव्युत्तर पदवी (एमबीए) यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विजयच्या दीक्षांत समारंभाचे फोटो शेअर करत, हा त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा, कृतज्ञतेचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. विजयने यापूर्वी भारत आणि स्कॉटलंड येथेही शिक्षण घेतले आहे. सध्या तो व्यावसायिक बास्केटबॉल आणि क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

विजयने पूर्ण केलेला हा अभ्यासक्रम क्रीडा क्षेत्रातील प्रशासन, व्यवसाय व्यवस्थापन आणि जागतिक क्रीडा प्रणालींवर आधारित असलेला एक विशेष आणि आधुनिक अभ्यासक्रम आहे. सुप्रिया सुळे यांनी ही बातमी शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी विजयच्या या यशाचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञानाचा वापर भारतातील क्रीडा क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी व ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे; तर दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी भारतातील शिक्षण व्यवस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलांचे परदेशातील शिक्षण या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech