टीसीएस प्रकरणी १,५८४ पानांचे दोषारोपपत्र दाखल

0

१७ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब

नाशिक : टीसीएस कंपनीतील अविवाहित तरुणीचर झालेला बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणाचा तपास करणान्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल १.५८४ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्याला ६० दिवस पूर्ण होण्याच्या चार दिवस आधीच एसआयटीने न्यायालयात भक्कम पुराव्यांची माहिती दिल्याने संशयितांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या गुन्ह्यात एकूण १७ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या तीन संशयितांविरुद्ध बलात्कारासह धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद आहे. त्यापैकी दानिश व तौसिफ यांना एसआयटीने २८ मार्चला अटक केली होती, तर पसार असलेल्या निदा खानला ७ मे रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेण्यात आले.

निदाच्या जामीन अर्जावर २५ मे तर दानिश व तौसिफध्या जामिनाबाबत ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. या गुन्ह्याला २६ मे रोजी साठ दिवस पूर्ण होत असल्याने त्याआधी नाशिक न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नुकतेच एसआयटीच्या तपासाचा मागोवा घेतला होता. त्यावेळी सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहायक निरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक भाईदास माळी यांच्यासह पथकाने तपासाची माहिती सादर केली होती. दोषरोप पत्र दाखल झाल्यानंतर निदाच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याने तिचा जामीन मंजूर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उर्वरित आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्रही पुढील आठवड्यात न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे समजते. या प्रकरणात पूर्वनियोजित कट रचून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याने तसेच पीडितेच्या पाश्र्वभूमीवरून यात ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यान्वये वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.

दोषारोपपत्रात काय?
मुख्य संशयित दानिश शेख याने पीडितेवर इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये लैंगिक अत्याचार केले, तसेच तिला लोणावळा येथेही नेण्यात आले होते, तिथलेही महत्त्वाचे पुरावे संकलित. संशयित निदा खानने पीडितेचा ब्रेनवॉश करण्यासाठी सोशल मीडियावर तब्बल १७१ वेगवेगळ्या लिंक्स पाठवल्या होत्या. सायबर विश्लेषणातून हा डेटा जप्त. पीडितेच्या घरातून संशयितांच्या धर्मातील महिलांचे पोशाख आणि धार्मिक पुस्तके जमा करण्यात आली आहेत, जी तिच्या धर्मांतरावा प्रयत्न दर्शवतात. निदा खानच्या जामिनाकडे लक्ष या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यंच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech