संसद रत्न’ पुरस्कार : युवा कार्यकर्त्यांना पुरस्काराचे श्रेय – नरेश म्हस्के

0

नवी दिल्ली : शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला जाहिर झाला आहे. मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला `संसद रत्न’ मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज भाषणांनी विरोधकांची झोप उडविणारे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा ‘संसद रत्न ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. संसद रत्न पुरस्कारांचा १६ वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असून, यावेळी १५० वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech